सासवड-नायगाव-सूपा रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्याची नायगाव ग्रामस्थांची मागणी  

पुरंदर, दि. ७ ऑक्टोबर २०२०: पावसामुळे पुरंदर तालुक्यातील सासवड -पारगाव मेमाणे- नायगाव-सुपा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत करण्याची मागणी नयागवाच्या ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचं एक निवेदन ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आहे.

पुरंदर तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस संपला असून लोकांना दररोजच्या प्रवासासाठी या रस्त्यांचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशाच खड्डेमय रस्त्यांवरून अनेक वाहने जात आहेत. खड्डेमय रस्ते असल्यामुळे प्रवाशांना पाठीचा त्रास, मणक्याच्या त्रास होत आहे. या रस्त्यावर अनेक अपघात देखील झालेले आहेत. इतकी बिकट अवस्था असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प का आहे? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करीत नसल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत.

रस्त्यावरील  खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बुजवावेत व वाहनचालकांना, प्रवाशांना होत असलेला त्रास थांबवावा. यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम सासवड विभागाचे उपविभागीय अभियंता यांना सिद्धेश्वर सोसायटीचे संचालक शांताराम  कड, नायगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी दिले आहे.

यानंतर बोलताना शांताराम कड म्हणाले की, रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दखल घेऊन रस्त्यावररील खड्डे बुजवावेत. तसेच साईटपट्ट्याची कामे करून घ्यावीत. लवकरच सासवड-नायगाव-सुपा या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल. असे सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदरचे अभियंता अनिल शिंदे  सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधीः राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा