नळाद्वारे पाण्यासाठी इजराइल ची घेणार मदत

steel long pipe system in crude oil factory during sunset

राष्ट्रीय : इजराइल हा असा देश आहे जिथे पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. भारतासारख्या देशात विपुल प्रमाणात पाणी असतानाही आपल्या येथील पाणी फेरवापर तंत्रज्ञान फारसे विकसित झालेले दिसत नाही: परंतु इजराइल मध्ये ८० टक्के सांड पाण्याचा वापर पाणी शुद्ध करून गुन्हा केला जातो. पाण्याच्या तंत्रज्ञानामध्ये इजराइल मध्ये सर्वाधिक विकास झाला आहे.
देशातील प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत सरकार इजराइल कडे मदत मागणार आहे. जलस्त्रोतांचे संवर्धन, विकास आणि व्यवस्थापन करण्यास केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अशी माहिती इजराइल मधील भारताचे नवे राजदूत संजीव सिंगला यांनी दिली. पुढील आठवड्यात जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे यासाठी इस्राईलला जात असून दोन्ही देश जलसंवर्धन मधील सहकार्य करण्यावर भर देणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर हा इजराइल मधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे या देशातील ८० टक्के सांडपाण्याचा वापर केला जातो. इजराइल मधील नागरिकांच्या या सवयीचा आदर्श आपण घेतला पाहिजे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा