गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू: तनुश्री दत्ता

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू: तनुश्री दत्ता

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू असल्याची जहरी टीका अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. १७ जानेवारी रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर तनुश्री दत्ताने मंगळवारी (दि.७) रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ती हे विधान केले आहे.

नाना पाटेकर आणि मनसेचे काय संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. नाना पाटेकर यांनी त्यावेळी मनसेच्या गुंडांना बोलवून सेटवर गोंधळ घातला. त्यानंतर गणेश आचार्यने माझे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.
नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर आणि पोलिसांवर गंभीर दोषारोप केले. निलेश पावसकर यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावेही नष्ट केल्याचं तनुश्रीनं म्हटलं आहे.
तनुश्रीने असे म्हटले आहे की, नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या. गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचे की यांचे काम झालं. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचं काय झालं?, असा सवालही यावेळी तनुश्री दत्ताने उपस्थित केला.

error: Content is protected !!
Exit mobile version