गोल पोस्ट स्पॉटलाइट मालिका विश्‍व डॉ. नीलेश साबळे यांनी घेतले शनिचे दर्शन

डॉ. नीलेश साबळे यांनी घेतले शनिचे दर्शन

अहमदनगर : दिग्दर्शक आणि लेखक तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. नीलेश साबळे यांनी शनिशिंगणापूर येथे सपत्नीक शनिदेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केला.
शनिशिंगणापूर देवस्थानतर्फे नितीन शेटे आणि अभिषेक बारहाते यांनी साबळे दाम्पत्याचा सत्कार केला.

यावेळी डॉ.साबळे यांनी सांगितले की, शनिदेवाचे दर्शन घेतल्याने मनाला समाधान लाभते. मी खूप वर्षांनी शनिशिंगणापूरला आलो असून आता येथे फार मोठा बदल झाला आहे.
महाराष्ट्रातील जनता आनंदी आणि हसत राहो,तसेच शनिदेवाचे आशीर्वाद आमच्या टीमसोबत राहोत हीच देवाकडे प्रार्थना करतो.
नीलेश साबळे यांनी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ना. शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख हेही उपस्थित होते. यावेळी गडाख परिवाराकडून पुस्तके देऊन साबळे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!
Exit mobile version