गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय शेण वॉर्नच्या ग्रीन कॅपसाठी दोन कोटींची बोली

शेण वॉर्नच्या ग्रीन कॅपसाठी दोन कोटींची बोली

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील अग्निपीडितांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न याने आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील ४ महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ६० कोटी वन्यजीवांचा ऱ्हास झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.
वॉर्न याने बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव काढला असून या २४ तासांत या कॅपसाठी ३ लाख डॉलरपर्यंतची बोली लागली आहे. सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत असलेल्या ख्रिस लीननं बिग बॅश लीगमधील सामन्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या पुढाकारात ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डी’आर्सी शॉर्ट हे खेळाडूही सहभागी झाले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील अग्नीतांडवात होरपळलेल्या जिवांसाठी जगभरातून मदतीसाठी हात पुढे येत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version