नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नांदेड, ५ ऑक्टोबर २०२३ : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत चाळीसच्यावर मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाजी टोपे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरून ४० हजारांहून अधिक रुपयांची औषधे खरेदी करण्यास डॉक्टरांनी भाग पाडले तसेच रक्त व इतर चाचण्यांसाठीही पैसे खर्च करावे लागले होते. असे कामाजी टोपे यांनी आपल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

कुरुळा येथील महिला प्रस्तुतीसाठी आली असता सिझेरीन झाले. त्यात माता व बाळाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास नांदेड पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा