नांदेड जिल्ह्यात एक लाख क्विंटल हरभरा खरेदी

नांदेड, दि.३० मे २०२० : जिल्ह्यात सुरु असलेल्या १५ हरभरा खरेदी केंद्रावर आजपर्यंत सहा हजार ६२५ शेतकऱ्यांचा एक लाख १३ हजार ८११ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.
या खरेदीपोटी ५५ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात एप्रिलपासून हरभरा खरेदी सुरू झाली. ही खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहा ठिकाणी सुरू आहे. यामध्ये नांदेड, हदगाव, देगलूर, बिलोली, मुखेड व किनवट येथील खरेदी केंद्राचा समावेश आहे.

हरभरा विक्री करण्यासाठी २५ फेब्रुवारीपासून २० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ६ हजार ६२५ शेतकऱ्यांचा एक लाख १३ हजर ८११ क्विंटल हरभरा विक्री झाला. विक्रीपोटी शेतकऱ्यांना ५५ कोटी ४७ लाख रुपये देण्याची प्रक्रिया सुरू केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा