रात्री उशिरा लागला नंदीग्रामचा निकाल, शुभेंदू यांनी केलं ममतांना १९५६ मतांनी पराभूत

21

कोलकत्ता, ३ मे २०२१: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसनं दणदणीत विजय नोंदविलाय. तथापि, ममता बॅनर्जी सुप्रसिद्ध जागा नंदीग्राम मधून १९५६ मतांनी पराभूत झाल्या. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केलाय. या जागेवर पश्चिम बंगालमधील सर्वात रोचक स्पर्धा होती. सुरुवातीला शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या पुढे होत्या. पण १६ राऊंडची मोजणी झाल्यानंतर ममता बॅनर्जी सुमारे आठ हजार मतांनी पुढे गेल्या. तथापि, यानंतर एक काळ असा आला की शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा ममता बॅनर्जी यांना मागे टाकले आणि अखेर विजयी ठरले.

नंदीग्राम जागेसाठी मतमोजणी पुन्हा आयोजित करण्याची तृणमूल कॉंग्रेसची विनंती निवडणूक आयोगानं फेटाळली. मतमोजणीनंतर ममता बॅनर्जी यांना १९५६ मतांनी पराभूत घोषित करण्यात आलं. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला आहे.

दरम्यान, टीएमसीच्या ३ सदस्यांच्या शिष्टमंडळानं कोलकाता येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिष्टमंडळानं नंदीग्राम निवडणुकीच्या निकालासह इतर काही मुद्द्यांवर चर्चा केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा