राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ‘नंदिनी’ वाघिणीचा मृत्यू झाला आहे..!

4

कात्रज, दि. ३१ जुलै २०२०: येथे आज रोजी पुण्यात प्रसिद्ध असणाऱ्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालायामधील एका वाघिणीचा मृत्यू झाला झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ही वाघिण आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. “नंदिनी” असे या मृत झालेल्या वाघिणीचे नाव आहे. आजारपणातूनच तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये या वाघिणीचा जन्म झाला होता. त्यात तीन बछडे होते. त्यातील ही वाघीण होती. दोन मादी आणि एक नर असे तीन बछडे होते. नंदिनी, दामिनी आणि तान्हाजी अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती.

संग्रहालय प्रशासनाकडून वाघिणीला सलाइन लावण्यात आले होते. तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासनकडून करण्यात येत होते. मात्र उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा