नंदकुमार बघेलजींचा महाराष्ट्र दौरा,आज बारामतीत

बारामती, २४ डिसेंबर २०२०: बारामती भारतातील छत्तीसगडचे देशव्यापी शेतकरी शेतमजूर, असंघटित कष्टकरी कामगार, मतदार यांच्यासाठी नंदकुमार बघेलजी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज बारामती शहरातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. बघेल हे काँग्रेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील आहेत. देशातील राजकीय सामाजिक विविध पातळीवरील शेतकरी कष्टकरी असंघटीत कामगार यांच्या प्रश्नावर दौरा सुरू केला आहे.

बारामती येथील योगेश संजय महाडीक यांनी शासकीय विश्राम गृह येथे विविध प्रश्न समस्या शेतकरी ते असंघटित मतदार या विषयी चर्चा परिषद व पञकार परिषद घेण्यात आली. यावेळी बघेल “शेतकरी घटकाला वेठीस धरुन हुकमशाहीकडे मोदी सरकारची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. शेतकरी देशाचा जगाचा पोशिंदा, जर आज एवढा त्रस्त, व्यतीत, दुःखी दिसत आहे हे खुप गंभीर आहे. शेतकऱ्यांना पिकवण्याचा अधिकार आहे परंतु विकण्याचा नाही. देशातील सर्वोत्परी पातळीवरील निवडणुका ह्या ब्यालेट पेपर वर व्हाव्या. देशाला बौद्ध धर्मा शिवाय पर्याय नाही,” असे म्हणाले.

यावेळी अजय हनुमंत लोंढे यांनी अनुसूचित जातीतील पीडित आर्थिक सहाय्य व न्याय पुनर्वसन मदत मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. कार्यक्रमास बहुजन, मुस्लिम, लहुजी, शिव शाहु फुले आंबेडकरी चळवळीतील महिला-पुरुष, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बघेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा