नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य २० तारखे पासून पर्यटकांसाठी खुले

39

नाशिक, २० नोव्हेंबर २०२० : नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातले नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे थंडीच्या हंगामात पक्षीप्रेमींना आठ महिन्यांनंतर देशीविदेशी पक्षी निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे.

यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार हे अभयारण्य आठ महिन्यांपासून बंद होते ते आता सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वनखात्याच्या वतीने देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी