गोल पोस्ट कृषी नंदुरबारचे पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबारचे पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबार, २४ एप्रिल २०२३: नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अवकाळी पावसाने झालेल्या तळोदा तालुक्यातील सोमावल ब्रु. शिर्वे तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जानीआंबा, मांडवीआंबा व सिंगापूर येथे अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतपिंकाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. गावित यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे (तळोदा), तहसीलदार रामजी राठोड (अक्कलकुवा), उप विभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, ग्रामसेवक बंजारा यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित यांनी अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्यासह झालेल्या भागांची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील पिकांचे व पडझड झालेल्या घराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. असं सांगण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version