नारायण राणे “ना घर का ना घाट का” शिवसेना…..

मुंबई, दि. १८ जुलै २०२० : गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे हे आघाडी सरकारला कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरुन धारेवर धरत आहेत. त्याचे प्रतिउत्तर देखील त्यांना आघाडी सरकार त्यांच्याच भाषेत उत्तर देत असल्याचे आता समोर आले आहे.

मराठा आरक्षण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आदी मुद्द्यांवर गुरूवारी भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. याचेच उत्तर आता त्यांना शिवसनेेने दिले आहे.

भाजपमध्ये नारायण राणे यांची स्थिती म्हणजे ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. राज्य कार्यकारणीतही नारायण राणे यांना स्थान न देवून भाजपनं त्यांची जागा दाखवून दिली आहे.त्यांचे काम केवळ बोल घेवडेपणाचे आहे. अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे’कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं,तसं शिवसेनेबद्दल द्वेष, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मत्सर या भावनेने नारायण राणे यांना पछाडलेलं आहे, असंही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा