पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेविषयी काहीच माहिती नसल्याचे आणि जनतेमध्ये मतभेद निर्माण करण्याच्या राजकारणामुळे भारताची जागतिक स्तरावर खिल्ली उडवली जात असल्याचे राहुल गांधी म्हटले आहे.
राहुल गांधी आपल्या निवडणूक सभेमध्ये बोलताना म्हटले की मोदी देशाच्या सध्याच्या समस्यांपासून लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. डेमोनेटिझेशन आणि ‘गब्बरसिंग टॅक्स’ (जीएसटी) ने लघु व मध्यम उद्योग नष्ट केले आहेत, असे ते म्हणाले. “जग भारताची खिल्ली उडवत आहे. ज्या देशाने जगाला मार्ग दाखवानाऱ्या, प्रेमाने जगायचे, वेगाने प्रगती प्रगती करण्याचे शिकवणाऱ्या देशात आज एक जात दुसर्या जातीशी लढत आहे, एक धर्म दुसर्याशी लढा देत आहे. नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था नष्ट केली” असे गांधी म्हणाले.