नरुटवाडी येथे रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नरुटवाडी (इंदापूर), दि. २१ जून २०२० : गेले कित्येक दिवस इंदापूर तालुक्यात सातत्याने सुरू असलेली रक्तदान शिबिराची शृंखला अद्यापही सुरूच आहे. माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती आणि विद्यमान पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यांतून माने यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने, प्रविणभैय्या माने युवामंच व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा महारक्तदान शिबिराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

नरुटवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे आज सोनाई ग्रुपचे संचालक अतुल माने यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. नरुटवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले तसेच नरुटवाडी येथील २६३ कुटुंबांना आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

आजच्या नरुटवाडी येथील या रक्तदान शिबिरामध्ये महिला भगिनींनी घेतलेला सहभाग ही उल्लेखनीय असल्याची माहिती यावेळी माने यांनी दिली.

याच सोबत आज नरुटवाडी येथे अतुल माने यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाही कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सुरेश दिवसे, शिवाजी कोकाटे, रमजान पठाण, विशाल दिवसे, अक्षय कोकाटे, समाधान कोकाटे, महादेव कोकरे, सुभाष दिवसे, किशोर हावलदार, सचिन दिवसे, विशाल दळवी, प्रविण देवकर, राहुल देवकर, साधू नरुटे, युवराज पांढरे, गिरीश मारकड आणि नरुटवाडी गावचे ग्रामस्थ व इतर सहकारी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा