नासा’नं केलं कल्पना चावलाच्या नावानं स्पेस शिप’चं यशस्वी प्रक्षेपण

वॉशिंग्टन, ३ ऑक्टोबर २०२०: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा’नं आज कल्पना चावलाच्या नावावर असलेल्या एका स्पेसशिप’चं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन साठी हे एक कॉर्पोरेट कार्गो स्पेसशिप पाठवण्यात आलं. या स्पेसशिपच प्रक्षेपण भारतीय मूळच्या असलेल्या एस्ट्रोनॉट कल्पना चावला यांच्या नावानं करण्यात आलं. भारतीय इतिहासातील पहिली महिला जीनं अंतराळात प्रवास केला, तसंच अंतराळ संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावली त्यामुळं अमेरिकन स्पेस एजन्सी नासा’नं हे प्रक्षेपण तीच्या नावानं केलं.

एस एस कल्पना चावला हे स्पेसशिप अटलांटिक रिजनल स्पेसपोर्ट (MARS) मधून वर्जीनिया स्थित नासा’च्या वॉलॉप्स फ़्लाइट फॅसिलिटी मधून रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी प्रक्षेपित केलं गेलं. हे स्पेसशिप दोन दिवसानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जवळ पोहोचंल आणि त्याच्याशी जोडलं जाईल. एनजी१४ मिशन अंतर्गत एस एस कल्पना चावला स्पेसशिप इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर तब्बल ३,६३० किलोग्राम वजनाचं सामान घेऊन पोहोचेल.

विशेष म्हणजे यापूर्वी एस एस कल्पना चावला स्पेसशिप’चं प्रक्षेपण दोन वेळा रद्द करण्यात आलं होतं. अमेरिकन एरोस्पेस कंपनी नार्थरोप ग्रुमेनच्या या कार्गो स्पेसशिप’ला शुक्रवारीच प्रक्षेपित केलं जाणार होतं. शुक्रवारी प्रक्षेपणाच्या २ मिनिट ४० सेकंद आधीच या स्पेस शिपच्या ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट मध्ये खराबी आल्यामुळं प्रक्षेपण टाळण्यात आलं होतं. नासा’नं याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी खराब हवामानामुळं देखील प्रक्षेपण रद्द करण्यात आलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा