युएस, 11 फेब्रुवारी 2022: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळावरुन नमुने मिळविण्याच्या अनोख्या योजनेला मंजुरी दिली आहे. या कामासाठी तंत्रज्ञान, उपकरणं आणि रॉकेट बनवण्याची जबाबदारी त्यांनी लॉकहीड मार्टिन या एरोस्पेस कंपनीला दिलीय. ही कंपनी असे रॉकेट बनवणार आहे, जे नमुने घेऊन थेट मंगळाच्या पृष्ठभागावरून उड्डाण करून पृथ्वीच्या दिशेनं येईल. या कामासाठी NASA ने कंपनीकडून 194 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1451 कोटी रुपयांहून अधिकचा करार केलाय. (फोटो: NASA/JPL/Caltech)
NASA ने 7 फेब्रुवारी 2022 रोजी घोषणा केली आहे की एरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टिन मार्स असेंट व्हेईकल (MAV) बनवंल. हे एक छोटं रॉकेट असंल, जे लाल ग्रहावरून नमुने घेऊन पृथ्वीच्या दिशेने उड्डाण करेल. या कामाला एक दशक किंवा त्याहून कमी कालावधी लागू शकतो. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळावरून काहीही मागवणे सोपं होणार आहे.
नासा मुख्यालयातील सायन्सचे सहयोगी प्रशासक थॉमस झुरबुचेन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की मंगळासाठी मार्स एसेंट व्हेईकल (MAV) तयार करणे हे एक मोठं पाऊल आहे. हे केवळ मंगळावर उतरण्यासाठी डिझाइन केलेलं नाही. उलट तेथून काहीतरी आणण्यासाठी बनवलं जात आहे. यामुळं अवकाश विज्ञानाचा इतिहास बदलेल.
थॉमस म्हणाले की, मार्स सॅम्पल रिटर्न मिशनचे (एमएसआरएम) काम संकल्पनेच्या पातळीवर पूर्ण झालं आहे. आता हे मिशन पूर्ण करण्यासाठी लॉकहीड मार्टिन आवश्यक उपकरणं, रॉकेट तयार करणार आहे. त्यांची चाचणी करेल. त्यानंतर ते मंगळाच्या दिशेनं पाठवले जाईल. लाल ग्रहावरील नमुना पृथ्वीवर आल्यावर त्याची अत्याधुनिक उपकरणांद्वारे चाचणी केली जाईल. कारण अंतराळातील कोणताही प्रवास पूर्ण करणं इतकं सोपं नसतं.
MSRM प्रकल्पात नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) एकत्र काम करत आहेत. या प्रकल्पाचा काही भाग यापूर्वीच पूर्ण झालाय. NASA ने फेब्रुवारी 2021 मध्ये Perseverance रोव्हर पाठवून हा भाग पूर्ण केला. या सहा चाकी रोव्हरने बरेच नमुने गोळा केले आहेत, तपासही केला आहे, पण मधेच तपासात अडचण आली आहे. याशिवाय, नासाच्या सॅम्पल रिट्रीव्हल लँडर (SRL) आणि ESA च्या अर्थ रिटर्न ऑर्बिटर (ERO) वर काम सुरू आहे. जे या दशकाच्या मध्यात लॉन्च केलं जाऊ शकतं.
SRL Perseverance Rover चे नमुने गोळा करेल. यानंतर, मार्स एसेंट व्हेईकल (MAV) मध्ये बसवलेल्या रॉकेटमध्ये ते पृथ्वीच्या दिशेने पाठवले जाईल. हे रॉकेट मंगळाच्या कक्षेत फिरणाऱ्या अर्थ रिटर्न ऑर्बिटर (ERO) शी जोडले जाईल. यानंतर ऑर्बिटर त्याला पृथ्वीच्या दिशेने आणेल. हे काम 2031 च्या आसपास पूर्ण होईल.
एकदा का नमुना पृथ्वीवर पोहोचला की, त्यानंतर शास्त्रज्ञ त्या नमुन्याचं परीक्षण करतील. मंगळावरील प्राचीन जीवनाशी संबंधित माहितीचा शोध घेतला जाईल. मंगळाच्या उत्पत्तीबद्दल जाणून घेतलं जाईल. नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की, हे एक ऐतिहासिक तंत्रज्ञान असेल. दुसऱ्या ग्रहावर जाऊन नमुने गोळा करणारी ही पहिली रोबोटिक राउंड ट्रिप असेल. यावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळावर अंतराळवीर पाठवणं फायदेशीर ठरणार आहे.
बिल नेल्सन म्हणाले की, मंगळाच्या सॅम्पल रिटर्न प्रोग्राममध्ये अमेरिकेची गुंतवणूक खूप उपयुक्त ठरणार आहे. हे आमचं प्राधान्य आहे. नासा हे अवकाशातील जगातील सर्वोत्तम आहे. हे जगभरातील एजन्सी आणि संस्थांसोबत जागतिक स्तरावरील करार करत आहे. MAV चा एकूण खर्च 1451 कोटी रुपये असेल. हा करार 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पुढील सहा वर्षे टिकेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे