नाशिक अंँटीकरप्शनची मोठी कारवाई, अहमदनगरच्या दोन अभियंत्याना तब्बल १ कोटीची लाच घेताना अटक

अहमदनगर, ४ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्रात दररोज लाचखोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एकीकडे नांदेडमधून एका अभियंत्याला लाच घेताना पकडण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे, तर दुसरीकडे अहमदनगरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केल्याने आता सर्वत्र चर्चा होत आहे.

लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील ५०% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे. याप्रकरणी नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अहमदनगरच्या औद्योगिक विकास महामंडळांतर्गत तक्रारदार ठेकेदाराने १०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे बिल २ कोटी ९९ लाख रुपये होते. त्यानंतर हे काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने बिलाची मागणी केली. पूर्वीचे बिल काढून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची सही करून घेण्यासाठी, तत्कालीन सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी तक्रारदाराकडे एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अशा परिस्थितीत अभियंत्याना या प्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा