नाशिक जिल्ह्यात २१५ मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिक, दि.१३ जून २०२० : नाशिक शहरात शुक्रवार( दि.१२) पासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमानी, वाहनधारकांची चांगलीच धावपळ झाली. शुक्रवारी शहरात जवळपास ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण २१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

अचानक सुरू झालेल्या पावसाने शहरातल्या जनजीवनावर परिणाम झाला. मात्र, गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी ही वाढली असून गंगापूर धरण क्षेत्राच्या व्यतिरिक्त गोदावरीला मिळणारे छोटे-मोठे नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात काहीशा प्रमाणात वाढ झाली असली तरीही कोणत्याही प्रकारचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आलेला नाही. त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर हा पावसाच्या इतरत्र आलेल्या पाण्याचा आहे.

त्याचबरोबर सकाळी शहरातील ब्रिटिशकालीन पूल असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलाखालून ६४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. नाशिकसह त्रंबकेश्वरमध्ये २३ सिन्नरमध्ये ३२ सुरत जाने वाली भागामध्ये २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण २१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

दारणा धरणातून ११०० क्यूसेक आणि गोदावरीला आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे
नांदूर-मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी रात्री ९ पासून तर आतापर्यंत १ हजार ३६८ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे सर्व पाणी पुढे जायकवाडीला जात असल्याने नाशिक शहरात दमदार पाऊस झाला आहे.
याबाबत हवामान विभागाने वर्तविलेल्या शनिवार आणि रविवारी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा