नाशिक: चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. काल रात्री नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मनमाड सह काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. राम गुळणा पंझन नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासन,सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नांदगाव शहरातही मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे.
उत्तर महाराष्ट्र मध्ये चक्रीवादळाचा तडाखा असल्यामुळे काल नाशिक मधील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. काल दुपारी या पावसाला सुरुवात झाली होती तर काही ठिकाणी काल रात्री मुसळधार पाऊस पडला.