नांदगाव, नाशिक १६ डिसेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव येवला रोडवरील रेल्वे गेट परिसरात रस्त्यावर खड्डे पडल्याने धुळीचे साम्राज्य वाढले आहे. उडणाऱ्या धुळीने रस्त्यावरून जाणारे लोक हैराण झाले असून येथील स्थानिक दुकानदारांना आपल्या दुकानाला प्लॅस्टिकचे कव्हर वापरावे लागत आहे. धुळीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे लक्ष देण्याची मागणी दुकानदार आणि नागरिक करत आहेत.
खड्डे, खडी, सिमेंट आणि मातीमिश्रित बारीक खडी रस्त्यावर पसरल्याने रस्त्यांची दुर्दशा होऊन वाहनांच्या वर्दळीमुळे त्याचे कण हवेत उडत आहे. या धुळीचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार, विद्यार्थी, ज्येष्ठ, वृद्ध, लहान मुले यांना होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच सायंकाळच्या वेळेत हवा कुंद असल्याने उडणाऱ्या धुळीचे प्रमाण अधिक असते. यामुळे संबंधित रस्ते भागात धुळीच्या थरांचे पट्टे तयार होत आहेत. या प्रदुषित वातावरणाचा या भागातील नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असुन वेळीच रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे