गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिकला राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप

नाशिकला राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप

नाशिक, ५ जानेवारी २०२३ : पेठहून नाशिककडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला बुधवारी (ता. चार) पंचवटीत अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. चालकाने प्रसंगावधान दाखवीत बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर प्रवासी उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावर मिरची चौक परिसरात काही महिन्यांपूर्वी यवतमाळ येथील खासगी प्रवासी बस, सप्तश्रृंगी गड परिसरात राज्य परिवहन महामंडळाची बस, सिन्नर तालुक्यातही पळसे परिसरात बसला आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.

या घटना ताज्या असताना बुधवारी पेठहून नाशिककडे येणारी बस पंचवटीतील फुलेनगरात आली असता अचानक बसमधून धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. प्रवासी तातडीने खाली उतरले. मुख्यालयातून बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version