गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा नसिरुद्दीन शाह, नीना गुप्ता यांना पुरस्कार

नसिरुद्दीन शाह, नीना गुप्ता यांना पुरस्कार

मुंबई : अंधेरी येथील ओडियम ऑडीटोरियम मध्ये पार पडलेल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह व अभिनेत्री नीना गुप्ता यांना पुरस्कार मिळाला आहे.
शाह यांना “द वॉलेट” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर अभिनेत्री नीना गुप्ता यांना ज्युरीद्वारे देण्यात येणारा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.
प्रज्ञेश सिंह यांनी या फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. तर सुभ्रांशु दास या फेस्टिव्हलचे निर्देशक होते. फेस्टिव्हलचे हे पहिलेच वर्ष होते.
चित्रपट : या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील १५ चित्रपट प्रदर्शित झाले. समारोप सोहळ्यात डॉक्युमेंटरी, लघुपट, आणि चित्रपटसहीत १६ २श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version