नवी दिल्ली : यंदाचा नाताळ व नववर्षाची स्वागतासाठी तयारी करणाऱ्या मद्य प्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे.
या नाताळनिमित्ताने २४ व २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
तसेच बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी मद्य प्रेमींना चांगलाच साजरा करता येणार आहे. दरम्यान याबाबतचा आदेश नुकताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केला आहेत.