नातेवाइकांच्या निष्काळजीपणामुळे ८२ वर्षीय महिलेला गमवावे लागले प्राण

पुरंदर, दि. ११ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथे मुंबईहून आलेल्या कोरोना बाधित मुलाच्या संपर्कात आल्यामुळे ८२ वर्षीय महिलेला कोरनाची लागण झाली. काल उपचारादरम्यान या महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. नातेवाईकांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला प्राणाला मुकावे लागले आहे.

मुंबईहून आलेल्या लोकांना विलागिकरणात राहण्याच्या प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पुरंदर मध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसते आहे. आज पुरंदर तालुक्यातील ८२ वर्षीय महिलेला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईहून गावाकडे येताना अनेकजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असते . गावाकडे आल्यावर येथील प्रशासनाला आम्ही वैद्यकीय चाचणी करून आलो आहे व आम्हाला कोणताही रोग नाही असे ठणकावून सांगतात. मात्र असे असले तरी मुंबईहून आलेल्या लोकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण आता वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. गुऱ्होळी येथील प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे गावाकडे येणारे मुंबईकर लोकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. मुंबईहून आलेल्या लोकांनी विलगीकरणात रहावे याबाबत अनेक वेळा सांगितले जाते. मात्र शहरी लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याच नातेवाईकांना त्याची किंमत मोजावी लागत आहे. यापुढे लॉकडाऊन शिथील केले असले तरी लोकांनी गावाकडे आल्यावर स्वतःहून विलगीकरणात रहावे असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे

दरम्यान आज सकाळी तहसील कचेरीतील एका कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे तर पुरंदर दौंडचे प्रांतआधिकरी प्रमोद गायकवाड यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घऊन लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून लोकांनी सामाजिक अंतर पाळावे व तोंडाला मास्क वापरावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. तहसिल कार्यालयातील संबधित व्यत्ती कोरोना पॉझिटिव्ह असला तरी कार्यालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा