गोल पोस्ट इतर राजकारण नाशिक जिल्हा परिषदेला जलशक्ती मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नाशिक जिल्हा परिषदेला जलशक्ती मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

नाशिक, १९ नोव्हेंबर २०२० : ग्रामीण स्वच्छतेविषयी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिकच्या जिल्हा परिषदेला केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबाबत नाशिक तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे केंद्राने कळविले आहे. दूरदृश्य प्रणालीव्दारे उद्या सकाळी साडेअकरा वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version