राष्ट्रीय कॅडेट कोर्डे कॅडेट्सचा फिट इंडिया चळवळीत सक्रीय सहभाग.

पुणे, ३१ ऑगस्ट २०२० : फिट इंडिया चळवळ ही शारीरिक क्रियाकलाप आणि खेळांना दैनंदिन जीवनात समाविष्ट करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देशव्यापी चळवळ आहे. निरोगी भारतासाठी काम करण्याची ही एक अनोखी आणि रोमांचक संधी याद्वारे उपलब्ध झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल.

१५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत फिट इंडियावरील ऑनलाइन जागरूकता मोहीम राबविण्यात येणार आहे . राष्ट्रीय कॅडेट कोर्डेचे कॅडेट्सनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

या मोहिमेसाठी पुणे ग्रुपचे कॅडेट्स खूप उत्सुक आणि सक्रिय आहेत. ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये आणि २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी १५ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाइन मोहीम सुरू झाली.

विविध इनडोअर आणि बाह्य क्रियाकलाप, योग, स्ट्रेचिंग आणि स्किपिंग व्यायाम, एरोबिक्स, जॉगिंग, सायकलिंग, पारंपारिक खेळ जे शारीरिक सामर्थ्य वाढवते अश्या खेळांचा व शारीरिक क्रियाकलाप यांचा समावेश ह्या मध्ये होता.

यावेळी कॅडेट्सने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा उपयोग करत घरी राहून ब्लॉग्ज, पोस्टर्स बनवली.
त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने सर्व्हे करत त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि शेजार्‍यांना तंदुरुस्त व निरोगी कसे राहता येईल या करिता जागरूकता ही केली.

‘तब्बल १२००० हून अधिक कॅडेट्सनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला आहे. आणि त्याबरोबर ३५०८ कुटुंबांनी फिटनेस कार्यात भाग घेतला. २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी पुणे मधील कॅडेट्सचा सहभाग कौतुकास्पद आहे आणि येत्या काही आठवड्यांत फिट इंडिया मोहिमेमध्ये सहभागी होणार्‍या कुटूंबियांची संख्या वाढेल,’ असे या वेळी २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनायक चव्हाण यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा