न्हावी गावातील पूरग्रस्तांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मदत..

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप …

पुढील काळात देखील मदत करणार..


इंदापूर, २१ ऑक्टोबर २०२० इंदापूर तालुक्यात बुधवार (दि.१४) रोजी ढगफुटी सदृश पावसाने हाहाःकार माजविला.यामध्ये तालुक्यातील न्हावी येथील अनेकांच्या घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर पडले.राजकीय,प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी या  ठिकाणची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र तब्बल आठ दिवस उलटून ही येथील नागरिकांना कसलीही मदत मिळाली नसल्याचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या इंदापूर पदाधिकाऱ्यांना समजलं आणि त्यांनी येथील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला.

माजी समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली  इंदापूर तालुक्याच्या वतीने न्हावी गावातील पूरग्रस्तांना तातडीने अन्नधान्याची मदत करण्यात आली. गेली तीन-चार दिवस राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश युवक उपाध्यक्ष  नवनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून  बुधवारी दि.२१ रोजी  पूरग्रस्त बांधवांना अन्नधान्य वाटप करण्याात आले. 

यावेळी कर्मयोगीचे माजी संचालक सुनील कणसे तसेच स्वाभिमानी चर्मकार महासंघाचे  प्रदेश उपाध्यक्ष राजू शेवाळे , कार्याध्यक्ष संजय खरात ,शिक्षक सेलचे अध्यक्ष भारत कांबळे ,युवक कार्याध्यक्ष अमोल भगत ,सामाजिक कार्यकर्ते बंडू शेवाळे ,अनिरुद्ध शेवाळे, न्हावी  शाखाध्यक्ष राहुल वेताळ यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले .

                                  यावेळी सुनील  कणसे  म्हणाले की राष्ट्रीय चर्मकार महासंघ वेळ पडेल त्या वेळेस मी संघटनेच्या पाठीशी उभा राहील.याचवेळी विलंब न लावता  राष्ट्रीय चर्मकार संघास १५०० रुपये रोख स्वरूपात चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे यांच्याकडे दिली .यावेळी नवनाथ शेवाळे म्हणाले की तालुक्यातील राजकीय नेते  आणि प्रशासन यांनी कसलीही मदत केली नाही.राहुल मखरे यांनी देखील सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू दिल्या.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा