इंदापूर, १८ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे परतीच्या पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासकीय पदाधिकाऱ्यांनी, राज्यमंत्र्यांनी या भागात पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. पंचनामे सुरू झाले आहेत मात्र अद्याप नुकसानग्रस्त लोकांपर्यंत कसलीही मदत पोचली नसल्याचे बधितांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या येथील दलित वस्तीतील फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माने, शिक्षक सेलचे अध्यक्ष भारत कांबळे, कार्याध्यक्ष संजय खरात, युवक अध्यक्ष गणेश माने दक्षिण कार्याध्यक्ष अमोल भगत, इंदापूर तालुका सदस्य रमेश खरात, खोरोची शाखाध्यक्ष राहुल शिरसागर, गटई सेल तालुकाध्यक्ष गणपत भोसले, सामाजिक कार्यकर्ते बंडू भाऊ शेवाळे, शाखा अध्यक्ष राहुल वेताळ या सर्व पदाधिकाऱ्यांनी न्हावी गावातील दलित वस्ती येथील त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना शासनाच्या योजनांच्या मदतीचे आश्वासन दिले व पुढील कारवाई चालू केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.