राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात छापेमारी मोहीम सुरु

श्रीनगर, ११ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात छापे टाकत आहे. एनआयएने आज सकाळी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल हुदा एज्युकेशनल ट्रस्ट, राजौरीच्या संशयास्पद हालचालींशी संबंधित प्रकरणात एनआयए जम्मू-काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, श्रीनगर, पुलवामा, बडगाम, शोपियान आणि बांदीपोरा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोध घेत आहे.

जम्मू काश्मिरातील बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेल्या जमात-ए-इस्लामी या संघटनेसाठी काम करत असलेल्या अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टच्या फंडिंग पॅटर्नमुळे राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा