गोल पोस्ट क्रीडा रयत शिक्षण संस्थेने केला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

रयत शिक्षण संस्थेने केला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

बारामती, ९ सप्टेंबर २०२०: बारामती शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात आज ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.

आज मंगळवारी राष्ट्रीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे प्राचार्य अंकुश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण देखील करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या पी.व्ही. जाधव, शिक्षक प्रतिनिधी गणपत तावरे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य व राष्ट्रीय खेळाडू बी.एन.पवार,ज्ञानेश्वर कडीमणी, कु.पुजा सरतापे हे उपस्थित  होते.

मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाविषयक कामगिरी विषयीची माहिती उपशिक्षक एस.टी. राऊत यांनी दिली. तर विद्यालयाचे क्रीडा संचालक सुजित जाधव यांनी क्रीडा प्रतिज्ञेचे वाचन केले. प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. इतकेच नाही तर योगगुरू बाळकृष्ण सुतार यांनी शारीरिक तंदुरुस्तीची प्रात्यक्षिके करून घेतली आणि काही खेळाडूंनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजन क्रीडासंचालक सुजित जाधव तसेच ऑनलाईन प्रक्षेपण शिक्षिका एस. ए.सातव यांनी केले. त्यामुळे सदर कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांना सहभागी होता आले. प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय ढवाण यांनी केले आणि आभार नितीन पवार यांनी मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version