बारामती, १० फेब्रुवरी २०२१: न्यू मीडिया सध्याचा सर्वांच्या परवलीचा शब्द झालाय. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात होते. ती मीडियासोबत इंटरनेट आणि त्यासोबत आलेल्या संवादाच्या संधीमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. कोरोना नंतर इंटरनेट सगळ्यांचा आधार होतोय. त्यामुळे बारामतीमधल्या टीसी कॉलेजमध्ये ‘न्यू मीडिया- नेचर, स्कोप एन्ड फ्युचर’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आय़ोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजकडून दि.११ ते १४ फेब्रुवारीला वेबिनार होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या वेबिनारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक,संपादक, पत्रकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कोलकत्ता येथील प्रा.डॉ.उमा शंकर पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथील डॉ. माधवी रेड्डी, डॉ. विश्राम ढोले, एबीपी माझाचे प्रसन्ना जोशी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर येथील डॉ. निशा पवार, डॉ.अलोक जत्राटकर, द हिंदू बिझनेस लाईनचे डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव, सकाळ मीडिया ग्रुपचे सम्राट फडणीस, लखनौ येथील डॉ. तनू डंग हे मान्यवर नव माध्यमाविषयी व्याख्यान देणार आहेत.
नवमाध्यमे ही आपल्या समाजजीवनातील महत्वाचा घटक म्हणून पुढे आली आहेत, अशावेळी त्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. महाविद्यामध्ये होणार असलेल्या या वेबिनारमुळे विद्यार्थ्यांना नवमाध्यमांची ताकद कळेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी व्यक्त केला आहे.
महाविद्यालयामध्ये रुसा योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर दिला जातो. त्याचाच भाग म्हणून ‘न्यू मीडिया-नेचर, स्कोप एन्ड फ्युचर’ हे वेबिनार आयोजित केल्याची माहिती रुसा योजनेचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. अजित तेलवे यांनी दिली. वेबिनार सर्वांसाठी विनामुल्य असून त्यासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन विभाग प्रमुख प्रा.रणजीत पंडित यांनी केले आहे.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव