भोकरदन येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षचिन्ह असलेली तुतारी वाजवुन आनंदोत्सव साजरा

भोकरदन, जालना २५ फेब्रुवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते निवडणूक आयोगाकडुन देण्यात आलेल्या “तुतारी वाजवणारा माणुस” या पक्षचिन्हाचे आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. या पार्श्वभुमीवर आज भोकरदन येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे, युवानेते सुधाकर पुंडलिकराव दानवे, तालुकाध्यक्ष श्री.रमेश सपकाळ तसेच रा.कॉ. शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तुतारी वाजवुन या अनावरण सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला.

तसेच मौजे पारध खुर्द ता. भोकरदन येथे यावर्षी होत असलेल्या श्री. दुर्गामाता मंदीर प्राणप्रतिष्ठा तपपुर्ती सोहळा निमित्त तसेच महारुद्र यज्ञ शिव महापुराण कथा व अखंड शिवनाम संकिर्तन सोहळ्यानिमित्त येणाऱ्या साधु-संतांचे आणि भाविक भक्तांचे आज भोकरदन येथे आगमन झाले असता त्यांचे मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी आदरपूर्ण स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी सर्व साधु-संतांनी तसेच महाराजांनी मा.आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभाशिर्वाद दिले. यावेळी सर्व भाविक भक्तांसाठी नाष्टा, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरिनाथ पवार, रामदास रोडे, मा. नगरसेवक नसिम पठाण, शमिम भाई मिर्झा, सरपंच पंडीतराव आगलावे, रमेश बरडे, रमेश कोलते, भिकाजी पाथरकर, इसरारखौँ पठाण, ईश्वर पा. पांडे, पुंजाराम साबळे, अदिल शहा, शंकर बुजाडे, रहेमान शेख, सुनिल पा.लोखंडे, सरपंच कृष्णा पा. मिसाळ, के.डी.दांडगे, आंबादास राऊत, संतोष ठाकरे, रमेश चोरमारे, निवृत्ती दौड, संजय सुरासे, अंगद सहाने, आरेफ सय्यद, सर्जेराव कड, गजानन घोडे, सारंगधर जामुंदे, संजय सोनवणे, अनिल शेठ संभेराव तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा