राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम करत फलटण मधिल युवा नेते प्रतीक पवार यांचा भाजप मध्ये प्रवेश.

फलटण, सातारा ११ जुलै २०२३ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे फलटण तालुका सरचिटणीस, पवारवाडी गावचे युवक नेतृत्व प्रतीक त्रिंबक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करत थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पवारवाडी आसू येथील युवक नेतृत्व प्रतीक पवार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण केली होती. ते पूर्व भागातील युवक नेतृत्व म्हणून उदयाला आले होते. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा राजीनामा देऊन, भारतीय जनता पार्टीत माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

फलटण पूर्व भागातील युवक नेतृत्व म्हणून प्रतीक पवार हे कार्यरत आहेत. त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांचे स्वागत झाले. त्यांना लागेल ती मदत व मोठे राजकीय ताकद दिली जाईल, त्याचबरोबर प्रतीक यांना लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

या वेळी प्रतीक पवार, शुभम पवार,आकाश पिसाळ, प्रशांत जगदाळे, प्रीतम मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय किसान मोर्चाचे धनंजय पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा