नात्यातला लाॅकडाऊन

सदा म्हणजे सदाशिव. गरीबीतच शिकला. लहान असताना बाप वारला. आईने लोकांची मोलमजूरी करून दोन मुलांना वाढविले सदाने आपला काॅलेज संपवून मुंबईला मामाच्या खोलीमध्ये गेला. नोकरी लागली हळूहळू जम बसवल्या नंतर भांडूपला डोंगरावर पहिली खोली घेतल्यानं. पगार वाढला तसा कर्ज काढून मुंबईला
” वन. बी. एच के ” घेतल्यान.
एक दिवस आईचा फोन आला.

” सदा बाबा तुझ्या लग्नाचा काय करूया”?

“आई तु काय ते ठरव मी तुझ्या शब्दाबाहेर नाही”

सदा तसा साधाभोळाच त्यांनी सगळी जबाबदारी आईवर टाकल्यान. आईने पाहुण्या सोयर्याला सांगुन ठेवल्यान. बघता बघता शुंभागीचा स्थळ ठरले आणि सदाचे दोनाचे चार झाले.
एप्रिलमध्ये लग्न झाले. सदा आठवडा भर गावाला राहुन मुंबईला गेला . गावाला आई आणि सदाचा लहान भाव बाळा. आता शुंभागी. यंदा शेतीला शुंभागीची मदत होईल म्हणुन आई खुष होती. मे महिन्याच्या शेवटी अचानक एक दिवस सदा गावाला हजर झाला.

” आई मी शुंभागीला मुंबईला घेऊन जायला आलो ” सदा आईची नजर चुकवत बोलला.

“अरे पण गणपतीपर्यंत ठेवली असती तर आम्हाला थोडी मदत झाली असती”
आईन सदाची समजूत काढीत बोलली.

” नाय पण माझेपण जेवणाचे हाल होतात”

सदाच्या शब्दात हतबलता होती. आई काय ती समाजायची ती समजली.हेच्या मागे शुंभागी आहे. शुंभागीने फोन करून सदाला बोलवून घेतल्यान.

” हरकत नाय बाबा जा घेऊन जा.गणपतीक मात्र हौशीक या म्हणजे झाले”. आई.

सदा बायको घेऊन मुंबईला गेला .थोड्याच दिवसात शुंभागी ” वन. बी. एच. के ची” मालकीन झाली. नवीन असताना सदा लाडान सगळा पगार आणून शुंभागीच्या हातात देत होता. हळूहळू सदाचा सगळा कारभार शुंभागीच्या हातात गेला.
दोन वर्षा झाली तशी आईन बाळाच्या लग्नाची गोष्ट सदाच्या कानावर घातली. सदाने बायकोच्या कानावर हि गोष्ट घातल्याने. पण शुंभागीन या गोष्टीकडे कानाडोळाच केल्या. बाळयाचा लग्न पार पडले. माली घरात आली . बाळाच्या लग्नात शुंभागीने सदाला हात मोकळा करू नाय दिला.
सासर्यान बांधलेल घर मोडकळीस आले होते तेव्हा आईची पण नवीन घर बांधाची ईच्छा होती. तशी आईन एक दिवस भितभित सदाकडे घराचा विषय काढला तसा सदाने बघुया म्हणुन थातूरमातूर उत्तर दिल्यान. फोन ठेवल्याबरोबर शुभांगीन नवरयाची झडती घेतल्यान…

” काय सांगत होती म्हातारी” ….?

शुभांगी रागारागातच सदाला विचारले.

” अग काय नाय ग…… नवीन घर बांधायाची म्हणती. ”

ह्या ऐकल्या बरोबर शुभांगीन ” वन. बी. एच. के” डोक्यावर घेतल्यान.

” मुंबईला काय झाड लागले आहे पैशाचे”?
जेव्हा बघा तेव्हा…. पैसे पाठव.. आम्हाला संसार नाय काय”?
सांगा त्यांना आम्हाला घराची गरज नाही आमचा ” वन बी एच. के” असे मुंबईला. गावच्या जमनीत आमचा पण वाटा असे. सगळा खातात एकटेच.. तर घर तरी बांधा……. शुंभागीचा तुनतुना झोपे पर्यंत चालूच होता.

सदाने काय तरी कारणं देत पैसे देणे जमायाचे नाय म्हणुन आईला फोन करून सांगितले. आई काय समजायचे ती समजली.
बाळा आणि मालीन कर्ज काढून छोटासा घर उभा केले. घर प्रवेशासाठी सदाला बोलवण्यात आले पण शुंभागीन काय सदाचा रजेचा अर्ज पास करून नाही दिल्यान . सदाने शुंभागीकडे दयेचा अर्ज केल्यान पण तो पण फेटाळला गेला. सदाला वाईट वाटला पण करतो काय सदाला नाईलाज होता. त्यावर्षी मे महिन्यात शुभांगी नवरयाला घेऊन माहेरी गेली. आता चार वर्ष गणपती आणि मे महिन्यात सदा शुभांगीच्या माहेरी जातो. सदा कधीतरी बाहेरून आईला फोन करतो.
…. गेल्या मार्चपासून मुंबईत कोरोनाचा संकट आले. मे महिन्यात लोक गावात येयाला लागले. तसा शुभांगीन भावाला फोन लावल्यान…
” सुन्या आम्ही येऊ का रे गावाला” शुंभागी.

भावान सरळच सांगितले…..

” ताई यंदा मुंबईकरांना गाववाले गावात घेण्यासाठी तयार नाही. तूम्ही तर परक्या गावातली माणसे.. तुम्ही आपली तुमच्या गावाला जावा ”

दरवर्ष ताईचा पाहुणेपान करून सुन्याची बायको वैतागली होतीच. यंदा सुन्याला बरा कारण भेटले.
कोरोनाचे दरदिवशी पेशंट वाढतच होते. तशी सदाला पोरांची काळजी वाटायला लागली.आपल्या गावाला जायची त्याची खुप ईच्छा होती पण जातो कोणत्या तोंडाने.
गावाकडे टि. व्ही वरचे बातमी ऐकुन आईचा
आणि बाळ्याचा जीव कासावीस झाला. मुंबईहून संगळ्याचे भावबंध गावाला येऊ लागले. कोण शाळेत तर कोण गोठ्यात राहु लागले. तशी आईने एक दिवस बाळयाला बोलली…..

” बाळा बघ रे फोन लावुन दादाला येतो काय.”
त्यांनी नात तोडले पण आपण तस नको करूया ”

होय ग आई मला पण तसच वाटत”
माली काळजी पोटी बोलली
.
बाळाने सदाला
फोन लावल्यान. फोन दोन तीनदा वाजला पण फोन घेयाची सदाची हिम्मत नाही झाली. बाळाची काळजी अजून वाढली म्हणुन त्यानी परत परत फोन केल्यान.

“अहो फोन घ्या भाव फोन का करतो तर बघा” शुंभागी.

शुंभागीन पहिल्यादांच बाळाचा फोन घेयाला विना अट परवानगी दिल्यान.
परत फोन वाजला तसा सदाने फोन घेतल्यानं…

” दादा…….!!”

पलिकडून काळजीचे स्वर सदाच्या कानात पडले.

“बोल रे बाळा….!” सदाचा कंठ दाटून आला.

” दादा कसा आहे”? वहिनी आणि पोरगी कशी आहेत ” ? बाळा अक्षरशः रडतच बोलला.

सदाने हातातल्या टाॅवेलाने डोळे पुसले. शुंभागी सगळ ऐकत होती. फोन स्पिकरवरच होता. पण आज परिस्थितीमुळे शांत होती.

” बरी आहेत. आई कशी आहे..? माली आणि पोरगी “? सदा.

“सगळी बरी आहेत पण तुम्ही गावाला या रे. आम्हाला काळजी वाटते ” बाळाआता रडायला लागला.

” बघुया सांगतो काय ते.” सदा.

सदाने फोन ठेवलाआणि शूंभागीकडे बघितले….

” माझ्याकडे काय बघतात.तुम्हीच काय ता ठरवा” शुंभागी नाईलाजान बोलली.

माहेरी जायाचे दोर भावाने कधीच कापून टाकल्याने तेव्हा तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता .

“अग मला पोरांची काळजी वाटते तेव्हा जाऊया ” सदा धीर करीत बोलला.

मुंबईची परिस्थिती लक्षात घेवून शेवटी शुंभागी गावाला जायला तयार झाली. सगळी तयारी झाली. पास काढून गावाकडे जायचा दिवस आला. शुभांगीन आपल्या ” वन. बी. एच. के”. वर नजर फिरवली. पण तिला आता गावचा घराचाआधार वाटायला लागला. तिला कळून चुकले मुंबईला कितीही मोठी रूम असली तरी गाव, देव आणि घरच्यांना विसरता कामा नये. माहेरी गावाला जातानाची ओढ आता घराकडे जाताना नव्हती . पण जायाल तर लागणार आहे. शुंभागीने नाही लाजाने गाडीत पाय टाकल्यान आणि गाडी रक्ताच्या नात्याकडे निघाली. शुंभागी आता डोळ्यासमोर गावचा गोठा दिसू लागला.गोठ्यात चौदा दिवस कसे काढायचे हेची काळजी लागली.
गाडी गावालापोचली. घरासमोर गाडी लागली तसे आई , बाळा
, माली आणि पोरगी खळ्यात उभी होती.
सदाला बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं. सदाच्या पोरांकडे बघून आईला बरा वाटल.शुंभागीने गोठ्याकडे बघितलं. गोठ्याची अवस्था बिकट होती. पण आज आधार तोच वाटला. गाडी परत मुंबईच्या दिशेन निघाली. सदा आणि शुंभागी गोठ्याकडे जायाला निघाली. तशी आई माली आणि मालीच्या पोरांना घेऊन गोठ्यात घुसली. गोठ्याच्या दारात आई ऊभी बोलली…..

” सदा आजपासून तुझी सोय घरात आणि आम्ही गोठ्यात.तुम्हाला मुंबईकरांना नाय जमणार…
.”

ह्या ऐकून शुंभागीच्या डोळ्यात पाणी आलं. आपली चुक तिला कळली.

” आई माफ करा …मि चुकले. तुमच्या मुलाला तुमच्या पासून

तोडले. आज कळले मला… खरी नाती तीच जी आपल्याला संकटात मिठी मारतात.”

शुंभागीने डोळे पुसले आणि खाली मान घालून घरात गेली. पाठीमागून सदाचे कुटूंब घरात गेले. बाळाचे साध्या चिर्याचा घर. भिंतीला प्लास्टरपण नाही. भिंतीला भांडी ठेवायला फळ्या मारलेली. फ्रिजचा थंड पाणी नाही पण घरात आपुलकिच थंडावा होता. मायेची ऊब होती. शुंभागीला आता ” आपली माती आपली माणसाची ” किंमत कळली होती. सदा घरात येऊन अंगणात बसला. घराच्या छप्पराचा
त्याला खुप आधार वाटला. आता कोणतही संकट आले तरी तेच्या बरोबर आई होती. तेचे पुरे
कुंटूब होतं. सदाला आता कशाचीच काळजी नव्हती. केवढे मोठे वादळ येऊ दे तरी तोंड देयाची ताकद आता सदाच्या अंगात आली होती.
शुंभांगीने घराकडे बघितले. साध्या चिर्याच्या घरापुढे ” वन बी.एच.के.” फिका पडला. घर बांधताना एका पैशाची मदत केली नाय तेची शुंभागीला लाज वाटली.
पाण्यासाठी मालीन हाक मारली तशी शुंभांगी भानावर आली . हांडा घेतल्यान आणि घराबाहेर गेली. मालीन शुंभागीच्या हांड्यात पाण्याची धार धरल्यान तशी शुंभागीच्या डोळ्यात पाणी आलं. आज शुंभागीचा हांडा पाण्याने नाय तर कुंटूबच्या प्रेमान भरलेला होता आई गोठ्याच्या दारात ऊभी होती. आईचे डोळे भरून आले. शुंभागीचा ” वन बी एच के” लाॅक झालेला तर गावमध्ये घरात आज गोकूळ झालेला होता.
चौदा दिवसांचा क्वाॅरनटाईन संपला सगळा कुंटूब एकत्र आलं आणि खर्या अर्थान नात्यातला ” लाॅकडाऊन ” संपला.सगळा कुटूंब एकत्र बघुन आईने डोळ्यातले आनंदाश्रू पुसल्यान आणि घरच्या कुलस्वामिनीला हात जोडले.
सर्वांना ऐकच सांगणे
रक्ताची नाती जपा………

चंद्रकांत कानडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा