गोल पोस्ट इतर पर्यटन नऊ वर्षाच्या बालकाने लिंगाणा केला सर

नऊ वर्षाच्या बालकाने लिंगाणा केला सर

वेल्हे : एक्सप्लोर टूर्स अँड ट्रेकर्स यांच्यातर्फे आयोजित केलेल्या लिंगाणा मोहिमेत सोहम राजेंद्र पंडित या ९वर्षाच्या बालकाने लिंगाणा किल्ल्यावर यशस्वी चढाई करून शिवरायांना मानवंदना दिली. या यशस्वी चढाईमुळे या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बनेश्वर विद्यालय भोर येथे इयत्ता ५ वी मध्ये शिकणाऱ्या सोहमने पहिल्यांदाच ट्रेकिंग करत ही यशस्वी कामगिरी केली आहे. यावेळी त्याच्या सोबत एक्सप्लोर ट्रेकचे संस्थापक आनंद कांबळे हेही १२ वर्षांपासून या ट्रेकचे आयोजन करतात. सोहम पंडित याला सुनील गुजर आणि युगधंर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version