नवले ब्रिज परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीचा शनिवारी वडगाव पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात रिक्षाला जोरदार धडक बसल्यामुळे रिक्षाचालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
नेमके काय घडले?
अपघाताच्या वेळी गौतमी पाटील स्वतः गाडीत उपस्थित नव्हती. अपघात तिच्या चालकाकडून घडला. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, तरी चालकाने मद्यप्राशन केले होते का याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































