नव्या वर्षाचे स्वागत करण्यात जग बुडालेलं असताना पुन्हा केरोनाने डोकं वर काढलं आणि यावेळी सर्वसामान्य जनतेबरोबरच यावेळी नेतेच कोरानैच्या जाळ्यात सापडले आहे.
मागच्या वर्षात योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, यांच्यासह आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांचा कोरोनाने जखडले आहेत. २०२१ च्या शेवटी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली. डिंसेबर महिना हा लग्न सोहळ्याचा महिना असल्याने या महिन्यात अनेक नेत्यांच्या मुलांची लग्न या महिन्यात पार पडली . या सोहळ्यात हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नातदेखील अनेक नेत्यांची हजेरी होती. त्यामुळे तेथेही कोरोनाचा शिरकाव होताच.
त्यानंतर आता नुकताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यानंतर लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांनाही कोरोना झाला आहे.
यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरानाची लक्षणे दिसून आली आहेत. यानंतर मनोज तिवारी, बाबुल सुप्रियो यांनाही कोरोना झाला आहे. कुटूंबातील सद्स्य आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सध्या प्रियांका गांधी यादेखील विलगीकरणात आहेत.
एकुणातच सामान्य जनतेनंतर आता तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला राजकीय नेत्यांना कोरोनाच्या विळख्यात जखडले आहे. आता अजून किती नेते या चक्रात अडकतात आणि त्यानंतरचे राजकारण काय होईल? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस