कचरा संकलनात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नवी मुंबई कचरामुक्त

5

मुंबई, दि. २२ मे २०२०: गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाच्या स्टार रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत २०१९-२० या मुल्यांकन वर्षासाठी नवी मुंबईला कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीत फाईव्ह स्टार रेटींग देण्यात आले. नवी मुंबईला हा पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेला महत्वपूर्ण घटक म्हणजे कचरा संकलन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे १०० टक्के कचरा उचलण्यात शहर सक्षम झाले.

कचरा संकलनाचे काम सोपे नाही, कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) म्हणण्यानुसार, शहरात दररोज सुमारे ७०० मेट्रीक टन कचरा तयार होतो.

कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कचरा वेळेवर उचलणे सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे महानगरपालिका उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी सांगितले. “एनएमएमसी कडे शहरातील प्रत्येक कचरा पेटीवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. प्रत्येक कचरा पेटीला मायक्रोचिप्स बसवल्या असून कचरा संकलनावर लक्ष ठेवण्यासाठी नागरी संस्था जीपीएस यंत्रणेचा वापर करते” असे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा