नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रद्द करणार का?

16

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी अरेच्या मेट्रोच्या करशेड बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक पायाभूत कामांचे प्रोजेक्ट्स मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू झालेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रकल्पांचं काय होणार? राज्य सरकार त्यात बदल करणार का? केंद्राची मदत त्या प्रकल्पांना मिळेल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात आम्ही सत्तेत होतो. पण ५ वर्षात विकासकामं कधी, कुठे कशी झाली किती खर्च झाला याबाबत मी माहीती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत.काही विकासकामं ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत.
मुख्यमंत्री म्हणाले, हे फक्त माझं सरकार नाही…तर तुमचं सर्वांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे. बुलेट ट्रेनचा आढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही विकासकामं करणं गरजेचं आहे; पण ती कामं रखडलेली आहे तेही पाहणार आहोत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा