नवी दिल्ली: पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
यामुळे सिद्धू यांनी या कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पत्र लिहून पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.
भारतातील शीख धर्मियांसाठी महत्त्वाचा असलेला करतारपूर कॉरिडोर ९ नोव्हेंबरला खुला करण्यात येणार आहे. त्यावेळी इम्रान खान करतारपूर कॉरिडोरचं उद्धाटन करणार आहेत.
करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून, नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे.










































