गोल पोस्ट आरोग्य नवनीत कौर राणा यांना पुन्हा कोरोनाची लागण

नवनीत कौर राणा यांना पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: नवनीत कौर राणा यांच्या बाबतीत पुन्हा कोरोना बाबत बातमी समोर आली आहे. रविवारी १५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. कारण, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांच्यासह त्यांचे पती रवीना राणा यांना देखील १४ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. त्यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण, घरी सोडल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांची पुन्हा तपासणी केल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नवनीत कौर राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना देखील कोरोनाची लक्षणं दिसून आली. यानंतर सहा ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपुर वरून मुंबईला हलवण्यात आलं होतं. मुंबईत त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं पण, त्यांना बरं वाटण्यास सुरुवात झाली होती.

अतिदक्षता विभागातून त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत जनतेचे आभार देखील मानले होते व आपल्याला बरं वाटत असल्याचं भावना देखील त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर त्यांना १५ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. परंतु, आज त्यांची चाचणी घेतली असता त्यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version