नवनीत राणा कोर यांना वाटू लागले अस्वस्थ, नागपूरला हलविण्यात आले…..

19

नागपूर, ११ ऑगस्ट २०२०: कोरोनाने राजकिय मंत्र्याच्या घरात शिरकाव करत नेत्यांबरोबरच त्यांच्या कुंटुबींयाना देखील आपल्या विळख्यात घेण्याचे काम सध्या करत आहे. तर आठवडा भरापुर्वी नवनीत राणा कोर यांच्या घरात कोरोनाने शिरकाव करत नवनीत यांच्या सहित १० जणांना या विषाणुंची लागण झाली आहे.ज्यामधे त्यांच्या मुलांचा समावेश देखील आहे.

तर याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा कोर यांना ६ दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. तसेच डाॅक्टर्सने सोमवारी अचानक हा निर्णय घेतला. नागपूरच्या वाॅकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार होतील असे डाॅक्टर्स कडून सांगण्यात येत आहे. तसेच नवनीत राणा कोर यांच्या प्रकृतीवर डाॅक्टरांच्या चमूचे विशेष लक्ष आहे.

नवनीत राणा कोर यांच्या कोरोनाची बातमी महाराष्ट्रात कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनेकजण हे त्यांच्या व संपुर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी