नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२२: भारताच्या सागरी इतिहासातील आतापर्यंत चे मोठे जहाज आणि स्वदेशी बनावटीच्या विमानवाहूक ‘INS विक्रांत’ लवकरच पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यान्वित होणार आहे. प्रत्येक भारतीय खासकरून मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी घटना होणार आहे कारण भारतीय नौदलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून बनवलेले एक नवीन चिन्ह देण्यात अल आहे. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हंटले जाते. त्यांच्या आरमाराची ख्याती होती.
आयएनएस विक्रांतचे कार्यान्वित होणे हे संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. विक्रांतच्या सेवेत प्रवेश केल्यामुळे, भारत यूएस, युके, रशिया, चीन आणि फ्रान्स सारख्या देशांच्या निवडक गटात सामील होईल ज्यांच्याकडे स्वदेशी डिझाईन आणि विमानवाहू जहाज तयार करण्यासाठी क्षमता आहे, जो भारत, सरकारच्या भाग आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड