नवी दिल्ली, १५ जुलै २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सौदयावर मोहर उमटली, याची माहिती आज केंद्र सरकारकडून देण्यात आली. भारतीय नौदलला अत्याधुनिक लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी, राफेलची निवड सरकारने आज जाहीर केली. फ्रान्समधील राफेल जेटची २६ नेव्हल व्हेरिएंट आधीच सेवेत असलेल्या ३६ राफेल विमानांच्या ताफ्यात सामील होतील, असे फ्रान्सचे एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने म्हटले आहे.
भारतामध्ये आयोजित केलेल्या यशस्वी चाचणी मोहिमेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीदरम्यान राफेलने भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण केल्या आणि त्यांच्या विमानवाहू वाहकाच्या वैशिष्ट्यांना पूर्णपणे अनुकूल असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने राफेल खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
करारावर स्वाक्षरी केल्याच्या तीन वर्षांच्या आत विमानांची डिलिव्हरी सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे. अंतिम सौदयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी जवळपास एक वर्ष लागू शकेल. कारण किंमतीबाबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर