गोल पोस्ट गुन्हा “मनी लॉन्डीग प्रकरणात नवाब मलिकांची सक्रीय भूमिका”; ईडीकडून विशेष पीएमएलए प्रतिज्ञापत्र दाखल

“मनी लॉन्डीग प्रकरणात नवाब मलिकांची सक्रीय भूमिका”; ईडीकडून विशेष पीएमएलए प्रतिज्ञापत्र दाखल

मुंबई, २० जुलै २०२२: अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला पुन्हा विरोध केला आहे. दाऊद इब्राहिमची बहिन हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लॉन्डीग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे ईडीने न्यायालयात म्हटले आहे. नवाब मलिक यांना फेब्रुवारीमध्ये मनी लॉन्डीग प्रकरणी अटक करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मलिक, त्यांचा भाऊ अस्लम, हसीना पारकर आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार खान यांच्यात कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड संदर्भात अनेक बैटका झाल्या होत्या.

नवाब मलिक गेल्या सहा आठवड्यापासून वैधकीय उपचरासाठी तुंरुगाबाहेर आहेत. हे लपवण्यासाठी जामीन अर्जाचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यांना आता पुढील उपचाराची गरज नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवावे, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version