मुंबई, 17 ऑक्टोंबर 2021: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता त्यांनी NCB चे साक्षीदार फिक्स्ड असल्याचा आरोप केलाय. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट खटले बनवते.
फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीसोबत NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची वकील बहीण जस्मिन वानखेडे यांचं चित्र दाखवताना नवाब मलिक यांनी आरोप केला की फ्लेचर जस्मिनचा भाऊ आहे, तर दुसरीकडे फ्लेचर एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून पाहण्यास मिळाला आहे.
शनिवारी त्यांनी ट्विट करून सांगितलं की, यावेळी मी एनसीबीचं आणखी चुकीचं काम उघड करीन. मात्र, यावेळी ते पत्रकार परिषदेद्वारे नव्हे तर त्यांच्या ट्विटर हँडलवर खुलासा करेल. त्यांनी अशी काही ट्विटही केली आहेत.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विषयी असलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारलं आहे की फ्लेचर पटेल कोण आहेत? तो NCB आणि त्याच्या एका अधिकाऱ्याशी कसा संबंधित आहे? या फोटोत फ्लेचर पटेल कोणासोबत दिसत आहे, ज्यांना तो ‘माय लेडी डॉन’ म्हणतो. कोण आहे ही ‘लेडी डॉन’?
त्याचवेळी फ्लेचर पटेल यांनी म्हटलंय की, मला साक्षीदार होण्यासाठी परवानगीची गरज नाही. मी ड्रग्ज विरोधात NCB मोहिमेला पाठिंबा देत आहे. नवाब मलिक या प्रयत्नाला पायबंद घालत आहेत.
तत्पूर्वी, बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी क्रूज ड्रग्स प्रकरणात भाजप कार्यकर्ते मनीष भानुशाली आणि केपी गोस्वामी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी क्रूझवर पडलेल्या छाप्याला बनावट म्हटलं.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, एनसीबीने त्यांच्या जावयाला अडकवलं आहे. त्याचप्रमाणे, आर्यन खानला क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या ड्रग्सच्या तपासादरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही एनसीबीने अटक केली होती. समीर खानला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे