नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला, आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२०: २२ राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरुद्ध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकार वर सातत्याने टीकास्त्र सोडत असतात. राज्य सरकार योग्य फॉरमॅटमध्ये केंद्राकडे मदत मागत नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता याला प्रत्युत्तर राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. बिहार निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस प्रचार करताना निदर्शनास आले ही बाब हाताशी घेत नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्याबाबत बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही.

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते असताना बिहारमध्ये जाऊन म्हणतायत की, ‘बिहारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रेम आहे’. ते महाराष्ट्राबाबत दुजाभाव करतात. आता ती वेळ राहिली नाही. हाफचड्डी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात एक बोलायचं, असं चालणार नाही. आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात, असा घणाघात मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

सध्या मलिक अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. मलिक यांनी काल सेलू मानवत तालुक्यातील चार ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर त्यानी कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत बोलताना मलिक म्हणाले की, केंद्र सरकार राज्याला जीएसटी देत नाहीये, एनडीआरएफनुसार राज्याला मदत ही करीत नाहीये. १० हजार कोटी रुपयांची मदत द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत, पण तितकी मदत देण्याची आमची इच्छा आहे. यासाठी सरकारला कर्ज काढावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा