नागपूरच्या सुनीता येरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती

नागपूर १७ मार्च २०२४ : नागपूरच्या सुनीता येरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आज १७ मार्च रोजी, रवीभवनात पक्षाच्या मिटिंग मध्ये सचिव महाराष्ट्र प्रदेश पद स्वीकार करतांना शेकडो कार्यकर्त्यांनी सुनीता येरणे यांच्या सोबत पक्ष प्रवेश केला.

सुनीता येरणे यांनी आपले विचार व्यक्त करतांनी सांगितले की, नागपूर सोबत महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी जोमाने व एकजुटीने काम करून पक्षासाठी जे काही करता येईल ते सर्वत्री प्रयत्न करू. निवडणूकीत पक्षाला मोठ्या प्रमाणात विजयी करण्यासाठी काम करू, कोणतीही अडचण आल्यास पक्षश्रेष्ठींना माहिती देऊन आपला पक्ष आणखी मजबूत करू तसेच महिलांकरिता पक्षातर्फे विविध योजना आणि कार्यक्रम राबवले जातील.

नागपूर येथील रविभवनात आयोजित पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी येरणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, महिला आणि नागरिक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे