रायगडच्या माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

माणगांव, रायगड ६ नोव्हेंबर २०२३ : रायगडच्या माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसुन आले. तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायत निवडणुकीत १२ ठिकाणी राष्ट्रवादी, ७ शिवसेना, २ भाजप, उबाठा गट १ आणि अपक्षांना ४ ठिकाणी यश मिळाल आहे. निकालानंतर निवडून आलेल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. विजयी उमेदवारांना विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी शुभेच्छा दिल्या असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल माणगांव तहसील कार्यालय येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी चोख पोलीस बंदोबस्तात लागला असून निकालात माणगांव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. माणगांव तालुक्यातील दहिवली/गोवले, मोर्बा, पुरार, जिते, काकल, नागाव, शिरसाड, विहुले, मांजरवणे, चांदोरे, गोवेले, वारक, वडवली, कडापे, वणीमलईकोंड, उणेगाव, पळसगाव बु., रातवड, कविळवहाळ बु., वडगाव, भुवन, खरवली, अंबर्ले, भाले, गांगवली, लोणशी या २६ ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपला असल्यामुळे निवडणूक लागली होती. यामध्ये दहिवली/गोवेले, काकल, चांदोरे, कविळवहाल बु. विहुले या ५ ग्राम पंचायती सरपंच पदासाठी बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २१ ग्राम पंचायतीसाठी निवडणूक पार पडली.

निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी पक्षाने मारली. तालुक्यातील एकूण २६ ग्राम पंचायत निवडणुकीत पुरार, काकल, विहुले, कडापे, वणीमलईकोंड, उणेगाव, रातवड, भुवन, भाले, गांगवली, लोणशी, मोर्बा या ग्राम पंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली. तर खरवली, शिरसाड, चांदोरे, गोवेले, वडवली, वडगाव, अंबर्ले या ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून तालुक्यात नागाव, पळसगाव बु. भाजपने जिंकल्याने तालुक्यात भाजपने दमदार इन्ट्री केली आहे. ग्राम पंचायत जिते उबाठा गटाकडे गेली असून दहिवली/गोवेले, वारक, कविळवहाल बु. मांजरवणे ह्यावर अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. माणगांव तालुक्यातील एकूण २६ ग्राम पंचायतीं मध्ये १२ राष्ट्रवादी, ७ शिवसेना, २ भाजप, उबाठा गट १, अपक्ष ४ मिळाल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव